न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२२) :- चिंचवडगावातील मोरया हॉस्पिटलकडून चापेकर चौकात येणारी वाहने पॉवर हाऊस चौकातून भोईर आळीमार्गे चापेकर चौकात येणार आहेत. उद्या (दि. ७) पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद होणार आहे.
वाहतुकीतील हा बदल २० दिवसांसाठी लागू आहे. मोरया हॉस्पिटलकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहणार आहे. चापेकर चौकात सुशोभीकरण तसेच रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे.


















