- दोन महिलांची सुटका; आरोपींवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२२) :- महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने कारवाई केली. दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पीडित दोन महिलांची सुटका करण्यात आली.
पीडित महिलांना आरोपींनी पैशाचे आमिष दाखवले. वेश्याव्यवसायासाठी त्यांना प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. हा प्रकार वाकड येथे मुंबई – बंगलोर मार्गावरील हॉटेल ओयो टाऊन येथे घडला. राज व आयशा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाकड पोलिस पोलिस अधिक तपास करीत आहेत.