न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षण विभागामार्फत २०१० ते २०१८ या कालावधीतील विविध विभागांचे लेखापरिक्षणाचे कामकाज केले जात आहे. करोना आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे लेखापरिक्षणाचे कामकाज प्रलंबित आहे.
जलद गतीने पूर्ण करण्यासाठी दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मानधनावर घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या स्थायी सभेने मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. पिंपरी महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागातील प्रचलित पध्दतीनुसार सर्व कार्यालयांचे १०० टक्के लेखापरिक्षण करण्यात येत आहे.
महापालिकेच्या कामकाजाचा वाढता व्याप विचारात घेता लेखापरिक्षणाचे कामकाजामध्ये देखील वाढ झालेली आहे. लेखापरिक्षणाचे कामकाज ६ गटांमार्फत करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सन २०१५-१८ या आर्थिक वर्षाकरीताचे लेखापरिक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी विभागाचे सेवानिवृत्त लेखा सहाय्यक संचालक हनुमंत कांबळे, लेखाधिकारी भालचंद्र पटवर्धन यांची नियुक्ती केली आहे.