न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ एप्रिल २०२२) :- महिला बचत गटाचे पैसे बँकेत भरण्यासाठी फिर्यादी या निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेच्या हातातून ११ हजार २८० रूपये असलेली बॅग हिसकावून पळून गेला.
पिंपळे गुरव येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथील रस्त्यावर सोमवारी (दि. ११) हा प्रकार घडला. स्मिता जयेश पिल्ले (वय ४०, रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.