न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२२) :- आयशर ट्रकमधून (MH 03 CV 9163) गोमांस वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सामाजिक सुरक्षा पथकाने किवळे येथील बंगलोर पुणे हायवे लगतच्या सर्व्हिस रोडवर मंगळवारी (दि. १२) रात्री १०:१५ वा छापा टाकून एका आरोपीला अटक केली.
तसेच, १० लाख रुपये किंमतीचा आयशर व ३ लाख रुपये किंमतीचे १५०० किलो गोमांस असा तेरा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागनाथ चणाप्पा नागेशी (वय ३८, रा. रावेत, मुळगाव – सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर, दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.