न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २६ ऑगस्ट २०२६) :- देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पूजा दिवटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शहराच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. रिक्त होणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका स्मिता चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
देहू नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपंचायतीवर मजबूत पकड राहिली आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदावर २०२२ मध्ये स्मिता चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींनंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये पूजा दिवटे यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
आता दिवटे यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. स्मिता चव्हाण यांची निवड बिनविरोध होते की निवडणूक रंगते, याकडे देहूकरांचे लक्ष लागले आहे.


















