- तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२२) :- शाळेतील मुलाला फिर्यादीच्या मुलाकडून धक्का लागला. यावरून चिडलेल्या तीन विद्यार्थ्यांनी फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. अज्ञात धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात वार केला.
यामध्ये फिर्यादीचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. काळेवाडीत बुधवारी (दि. २०) दुपारी साडेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. निखिल बाळू जोगदंड (वय १५ रा. काळेवाडी) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मुलाच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.