न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२२) :- महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दोघे ओबीसी आरक्षणासंदर्भात गंभीर नव्हते आणि फक्त एकमेकांवर चिखलफेक करत होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा नाकारता येणार नाही; पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आम आदमी पार्टीची मागणी पहिल्यापासून राहिली आहे आणि या पुढेही राहील.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीसंदर्भात आम आदमी पार्टी तयार आहे आणि सर्व जागा लढवविणार आहे. आप महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत असून लोकांना अरविंद केजरीवाल यांचे शिक्षण, आरोग्यावर आधारित दिल्ली मॉडेल मनात भरले आहे आणि संपूर्ण पिंपरी चिंचवडकर याची मागणी करत आहे.
लोकांच्या मनातच आप असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आप चांगली कामगिरी करेल आणि जनतेचे खरे नगरसेवक पालिकेत रुजू होतील अशी आम्हाला खात्री आहे.