न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२२) :- सोशल मीडियावरील एका पोस्टवर आक्षेपार्ह कमेट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. विजय नायकिंदे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय श्रीमंत कसबे (रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
फेसबुकवर एक पोस्ट होती. त्यावर आरोपीने आक्षेपार्ह कमेंट केली. यातून भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.