न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०२२) :- आजादी का अमृतमहोत्सव ७५ अंतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आयुर्वेद रुग्णालय व स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, निगडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे प्लास्टिक निर्मूलन व वापर न करणे याबाबत जागृती करण्यात आली.
यामध्ये रुग्णालयाच्या परिसरातील प्लास्टिकचा कचरा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांद्वारे गोळा करण्यात आला व प्लास्टिक चा न वापर करण्याबाबत शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्लास्टिक चे दुष्परिणाम एन. एस. एस. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेश म्हस्के यांनी वर्णन केले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अंजली जाधव व बालरोग विभागप्रमुख डॉ. माधवी देवदास यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अयूब शेख तसेच रुग्णालयीन कर्मचारी सुनिल तोडकर, राहूल बंडवाल, खंडागळे, राजेश हुसगे यांचे मोलाचे सहकार्य झाले.
या कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. रागिणी पाटील व उपप्राचार्य डॉ. राजकुमार बोबडे यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, नियोजन व आभार प्रदर्शन एन.एस.एस. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तेजश्री पवार हिने केले.