न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२२) :- उन्हाळी सुट्टी कालावधीत होणाऱ्या गर्दीमुळे सायन्स पार्क दर सोमवारीही प्रेक्षकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. उन्हाळी सुट्टीमुळे सायन्स पार्कला भेट देणाऱ्या विद्यार्थी-पालक यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे.
विविध शैक्षणिक सहलीही मोठ्या प्रमाणात येत आहेत. प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे सायन्स पार्कची दर सोमवारी असलेली साप्ताहिक सुट्टी रद्द करून सायन्स पार्क दर सोमवारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच दर शनिवार व रविवारी सायन्स पार्कची वेळ सायंकाळी ६.०० ऐवजी ६.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे यांनी कळविले आहे.