- शहरातील सुमारे बावीस टनापेक्षा अधिकचा कचरा संकलित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि “आपला परिवार सोशल फाउंडेशन” पुणे यांच्या सहकार्याने आज सकाळी पिंपरी येथील एच ए मैदान येथे “प्लॉगेथॉन ” मोहिम राबविण्यात आली.
मोहिमेत सुमारे साडेआठ टन (८.५ टन) इतका कचरा संकलित करण्यात आला. यात २५० स्वयंसेवक, महापालिकेचे ७० कर्मचारी, बीव्हीजी ग्रुपचे कर्मचारी, डिव्हाईन संस्थेचे कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. तर ३ सुमो वाहने, १ ट्रक यांचा वापर करण्यात आला.
दरम्यान महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थेच्या सहकार्याने आज स्पाईन रोडवर कुदळवाडी चौक ते कचरा संकलन केंद्रापर्यंत येथे प्लाॅगेथाॅन मोहिम राबविण्यात आली. त्यामधे एकूण २९७ स्वंयसेवक तसेच महापालिका कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी एकूण ८ टन कचरा संकलित करण्यात आला.
जिल्हा रुग्णालय सांगवी परिसरामध्ये महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने प्लॉगेथॉन मोहिम आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ४०० पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी ६ टनापेक्षा अधिक कचरा संकलीत करण्यात आला.


















