न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२२) :- सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस गेले असता त्याने पोलिसांना अरेरावी व धक्काबुक्की केली. पोलिसाच्या अंगावर येऊन ‘तुम्ही चूक करताय. मला कोणाच्या सांगण्यावरून पकडताय. सोडा मला. नाहीतर मी तुमची खोटी तक्रार करील’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार रविवारी (दि. १५) रात्री पावणेबारा च्या दरम्यान पिंपरीतील वैष्णोदेवी मंदिराजवळ घडला. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश करपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नितीन उर्फ यंग्या दिलीप शिंदे (वय ३४, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.