- पालिकेच्या जनसंवाद सभेत दिनेश यादव यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२२) :- महापालिकेची ” फ ” क्षेत्रीय कार्यालयात नुकतीच जनसंवाद सभा पार पडली. या सभेत माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय खाबडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
कुदळवाडीतील यादवनगर येथील डी पी १८ मी रस्त्यावर नवीन स्ट्रीट लाईट पोल बसविण्यात यावेत, शरदनगर परिसरात नियमितपणे औषध-धुर फवारणी करावी अशी मागणी यात केली आहे.