न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२२) :- वाकडच्या विनोदे वस्तीतील बोनहेर वाकड लिनस ग्रुप या बांधकाम साईटवर पार्किंगमध्ये ठेवलेले सहा लाख १९ हजार ५०० रुपयांचे कन्स्ट्रक्शन साहित्य चोरट्यांनी चोरून नेले.
हा प्रकार रविवारी (दि. २९) रात्री साडेआठ ते सोमवारी (दि. ३०) दुपारी पाच दरम्यान येथे घडली. कंपनीचे साईट इंजिनिअर शुभम गणेश शिंदे (वय २६, रा. आकुर्डी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.














