न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२२) :- पालकमंत्री अजितदादा पवार शुक्रवारी (दि. ३) रोजी पिंपरी – चिंचवड शहरात येणार आहेत. महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर ते चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तिथे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती निगडी येथे आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली.
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे अद्यापही सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. या चर्चेल आता पूर्णविराम मिळणार आहे.














