- ९५ टक्के मुलींनी मारली बाजी; यंदा निकाल घटला…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- इयत्ता बारावीचा पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९४.६४ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत साडेपाच टक्क्यांनी निकाल घटला आहे. यात ९५ टक्के मुलींनी बाजी मारली आहे. निकाल पाहण्यासाठी शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. निकाल पाहताच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जल्लोष सुरू केला
पिंपरी चिंचवड शहरातून १७ हजार ७९६ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. ९ हजार ५७१ मुले, तर आठ हजार १३३ मुली असे एकूण १७ हजार ७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ९९५ मुले आणि ७ हजार ७६१ मुली असे मिळून १६ हजार ७५६ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यात ९५.४२ टक्के मुलींनी बाजी मारली आहे. तर ९३.९८ मुले उत्तीर्ण झाले आहेत. चिंचवडमधील चिंतामणी रात्र प्रशालेने आघाडी घेत १०० टक्के यश मिळविले आहेत. शहरातील ३४ महाविद्यालयांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.