न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- वाल्हेकरवाडी – रावेत रस्त्यावर असलेल्या भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी सॅन्ट्रो कार (एम एच ४३/ ए ४७५५) मधून आरोपी आले. दरोडा विरोधी पथकाला अशी माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपींचा हा डाव उथळून लावला. ही कारवाई सोमवारी (दि. ६) रात्री पावणे अकरा वाजता करण्यात आली.
करणसिंग राजपूतसिंग दुधाणी (वय २५, रा. हडपसर), अनिल बच्चन टाक (वय २९, रा. ओटास्किम निगडी), जितसिंग राजपालसिंग टाक (रा. हडपसर), अक्षयसिंग उर्फ डिचक्या टाक (रा. हडपसर), लखनसिंग रजपूतसिंग दुधाणी (रा. हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील करणसिंग आणि अनिल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींकडून एक बोअर कटर, दोन स्क्रू ड्रायव्हर, एक कोयता, दोन लोखंडी कटावणी असे दोन लाख तीन हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.