न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- मूसेवाला हत्याकांडामध्ये सामील असणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्य स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव परिसरातून अटक केली आहे. आरोपीला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिद्धेश कांबळे उर्फ महाकाळ असे आरोपीचे नाव आहे.
ओंकार बानखेले खून प्रकरणात आरोपी असलेला संतोष जाधव याला लपण्यास कांबळेने मदत केली होती. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावला आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन निष्पन्न झाले होते. मुसेवाला हत्या प्रकरणातील १० शॉर्प शुटरपैकी दोघे जण पुणे जिल्ह्यातील होते. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी सिद्धेश कांबळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचा राहणार असून मंचरची त्याची सासुरवाडी आहे. जाधव हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले यांच्या खून प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून तो फरार आहे.