न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२२) :- अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. निगडी पोलिसांनी आणि शस्त्र विरोधी पथकाने देहरोड येथे ही कारवाई केली.
जुबेर नासिर शेख (वय २५, रा. ओटास्किम निगडी) याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुबेर शेख याला पिंपरी चिचवड पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०२० रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो जिल्ह्याच्या हद्दीत आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
अनुराग उर्फ डुंगाना गेशतेलगू ( वय १९, रा. देहरोड) असे शस्त्र विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अनुराग याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी २ एप्रिल २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत येऊन सोबत शस्त्र बाळगत होता. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला आंबेडकरनगर देहूरोड येथून अटक केली. देहरोड पोलिस तपास करीत आहेत.
















