न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतः चा वाढदिवस अनेक प्रकारच्या झगमगाटात व चमकोगिरीत तसेच उत्साहाच्या भरात साजरा करण्याची नवीन क्रेज युवावर्गात वाढत चालली आहे. मग, वाढदिवस साजरा करताना होणारी पैशांची बरबादी असो की, इतर प्रकारचे कार्यक्रम असोत, याकडे कोणाचेच लक्ष नसते.
परंतु, भोसरीतील युवा नेते विल्सन भाऊ काळे यांनी मात्र, या अनावश्यक खर्चास फाटा देत, एक नवीन आदर्श युवा पिढीपुढे ठेवला आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून, समाजातील वंचित, अनाथ व गोर-गरीब घटकांसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. तसेच शिवाई प्रतिष्ठान, हनुमान मित्र मंडळ व काळूदादा युवा मंचाच्या माध्यमातून दिघीतील ज्ञानदिप बालकाश्रम येथील अनाथ व गोरगरीब घटकास आर्थिक मदत तसेच अन्नदानाचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमास राहुल वायकर, दत्ता कातखडे, हजारे, परशुराम सुरवसे, मनोज गायकवाड, कानिफनाथ जाधव, शांताराम ढमाले, संदीप पवार, विशाल भोरे व आदी उपस्थित होते.
त्यांच्या या मदतीचा हात लाभल्याबद्दल आश्रमाचे व्यवस्थापक व गोरगरीब मुलांनी आभार मानले आहेत. तसेच त्यांना भरभरून आशीर्वादही दिले आहेत. समाजातील अशा आत्मकेंद्रित तसेच युवावर्गासमोर त्यांच्या या कृतीने आदर्श निर्माण केला आहे.