न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२२) :- भोसरीत एकाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला आहे. भोसरीतील निर्जनस्थळी आज सकाळी युवकाचा मृतदेह आढळून आला. दीपक गोपाळ वाघमारे (वय ३०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक वाघमारे यांचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. त्यांच्या डोक्यात दगड मारल्याची देखील जखम आहे. रात्री उशिरा ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली आहे.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुन करणा-या गुन्हेगारांचा पोलीस तपास करीत आहेत.
















