न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील ११ परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील २० ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूरी बाबतचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. परवान्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
जाहीरनाम्यातील सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना फॉर्म इत्यादीबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच संबंधीत परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.
स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज ३१ जुलै २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत भरता येणार आहेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळविले आहे.