न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२२) :- किवळेतील वैभव लाॅज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली. पथकाने बुधवारी (दि. १३) सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान कारवाई करीत दोन पीडित महिलांची सुटका केली.
आरोपी हे पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेलया रकमेतून स्वत:ची उपजिविका भागवित असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत दोन हजार ३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक विजय लक्ष्मण कांबळे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मोहम्मद बाशा शेख (वय ४५, रा. एमबी कॅम्प, देहूरोड), असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.