- मुसळधार पावसामुळे शाळा १६ तारखेपर्यंत राहणार बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे यांनी दिनांक १६ जुलै अखेर इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून पुणे जिल्हातील सर्व तालुक्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळांना दि. १३ जुलै रोजीच्या आदेशांन्वये सुट्टी घोषित केलेली आहे.
त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) शनिवार (दि. १६) अखेर सुट्टी घोषित करण्यात येत आहे, असे पालिका आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.