न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२२) :- कॅनडातील अलगोमा युनिव्हर्सिटी येथे प्रवेश मिळवून देतो असे आरोपींनी फिर्यादी सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून आरोपींनी १३ लाख २५ हजार रुपये घेऊन त्यांना अलगोमा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही.
फिर्यादीचा विश्वासघात करून त्यांनी दिलेले पैसे परत न देता फसवणूक केली. ही घटना पिंपरीतील खराळवाडी येथे फेब्रुवारी २०२१ ते ७ जानेवारी २०२२ या दरम्यान घडली.
दीपक रामधीरज यादव (वय ३१, रा. खराळवाडी, पिंपरी. मूळ रा नाशिक) यांनी गुरुवारी (दि. १५) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनदीप सिंग (रा. उत्तराखंड), पंकज अग्रवाल (रा. कानपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.