न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२२) :- आयटीसी लिमिटेड कंपनीच्या सर्व उत्पादनांची डिलरशिप मिळवून देतो, असे आरोपींनी फोन करून सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीस सिक्युरिटी अमाउन्ट म्हणून कोटक महिंद्रा शाखा पार्क स्ट्रीट कलकत्ता या बँकेचे खात्यात पाच लाख ९६ हजार ४०० रुपये भरण्यास सांगितले.
तसेच आयटीसी लिमिटेड कंपनीची खोटी कागदपत्रे बनवून फिर्यादीस देऊन त्यांची फसवणूक केली. ही घटना चऱ्होलीत घडली. सागर दिलीप ढोरजे (रा. चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शशांक अगरवाल व संजीवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.