न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२२) :- दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्यांची गाडी आडवली व चाकुचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील १२ हजार रुपयांचा मोबाईल व रोख दोनशे रुपये चोरले.
गुरुवारी (दि. १४) रात्री नऊ वाजता ही घटना घडली होती. सुरज बळी सोनकांबळे (वय २५ रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. १६) फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी राहूल टोनपे (वय २८ रा. पिंपरी) याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.