न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२२) :- सोळा वर्षीय मुलगी घरात एकटीच असताना आरोपी घरात शिरला. जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच आई-वडिलांना संगीतल्यास तुला बघून घेतो, अशी धमकी दिली.
यामध्ये पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली. ही घटना चिखली येथे घडली. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. अजिंक्य विकास पाटील (वय २७, रा. चिखली) असे आरोपीचे नाव आहे. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.