न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२२) :- चिंचवड येथील गंगानगर रोडवर फिर्यादी यांना एकाची मोटार दिसली. दरम्यान, फिर्यादी हे त्यांच्यात झालेल्या व्यवहाराबाबत विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना जबरदस्तीने त्यांच्या मोटारीत बसवून काही अंतरावर घेऊन गेले.
फिर्यादी यांना सत्तूरचा धाक दाखवत एक लाख रुपयांची मागणी करून धमकी दिली. आरोपीला पुण्यातून तडीपार केलेले असतानाही कुणाचीही परवानगी न घेता तो शहरात आला होता. योगेश शिवाजी आव्हाड (रा. पार्क स्ट्रीट, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार रफिक हनिफ खान (वय ३३), अक्रम हनिफ खान (वय २९) दोघेही रा. जिवलग हौसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी) यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.