न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२२) :- पान टपरीमध्ये ५५८१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला व सिगारेट विक्रीकरिता ठेवले. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी शुक्रवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास आरोपीच्या आकुर्डी येथील ओम साई स्टोअर्स नावाच्या पान टपरीवर कारवाई केली.
रामकुमार दशरथ जैस्वाल (वय ४२, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह नोपासिंग राजपूत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नोपासिंग याने तो गुटखा संशयित आरोपी रामकुमार याला पुरवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.