न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ” विभाजन विभिषिका स्मरण दिन ” १४ ऑगस्ट च्या अनुषंगाने फाळणीबाबत चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये फाळणीच्या प्रसंगांमध्ये झालेल्या महासंहारमध्ये बळी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या व त्यात हालअपेष्टा सहन केलेल्या भारतीय नागरिक यांच्या स्मृतीनिमित्त हा दिवस आयोजित केला जातो.
याबाबत माहिती देणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे नागरिकांसाठी खुले असेल. जास्तीत जास्त पिंपरी चिंचवड वासियांनी व शालेय मुलांनी सदर प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.












