- माजी महापौर राहुल जाधव यांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२२) :- भारतीय स्वत्नात्र्याच्या अमृतमोहस्तवा निम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत मा. महापौर राहुल जाधव यांच्या वतीने चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, मोशी भागमध्ये नागरिकांना मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात येत आहे.
राहुल जाधव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील हरघर तिरंगा मोहिमेमुळे येणाऱ्या पिढीमध्ये राष्ट्राभीमान जागृत होण्यासाठी मदत होईल तसेच भारताला स्वातंत्र्या मिळवून देण्यासाठी ज्या राष्ट्र्भक्तांनी बलिदान दिले त्या सर्व हुतात्म्यांचे बलिदान व त्यांचा इतिहास हा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. या निमित्ताने सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून (दि. १३ ते १५) या कालावधीमध्ये हरघर तिरंगा उपक्रम सर्वांनी राबवावा. तसेच नागरिकांसाठी मोफत तिरंगा ध्वज राहुल जाधव यांच्या कार्यालयमध्ये तसेच आमदार महेशदादा लांडगे यांच्या कार्यालयामध्ये उपलबद्ध आहेत.












