न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२२) :- पवना धरणातील पाणी साठा आज सायंकाळपर्यंत ९५.८० टक्के इतका झालेला आहे. त्यामुळे विद्युतर्निमिती गृहाद्वारे १४०० क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे.
धरणाच्या पाणलाेट क्षेत्रातुन येणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहुन रात्री १०.०० वाजता धरणाच्या सांडव्याद्वारे २००० क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे. धरणाच्या खालील बाजूकडील नदी तिरावरील गावांमधील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी व नदीपात्रात व लगत असलेली सर्व साधनसामुग्री व जनावरे सुरक्षित ठीकाणी हलविण्यात यावेत. जेणेकरून कुठल्याही प्रकारची वित्त व जिवीत हानी हाेणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पालिकेने कळविले आहे.













1 Comments
finasteride functional class
propecia for men to buy These results contribute to the thesis that BRCA1 germline mutation carriers are not only at risk for ovarian cancer, but also for fallopian tube carcinoma and peritoneal papillary serous carcinoma