न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन आणि दि. १६ ऑगस्ट रोजी पारशी नुतनवर्षानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने या आठवड्यात जनसंवाद सभा होणार नाही. मात्र त्यानंतर या सभांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.
जनसंवाद सभा पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवार दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत होणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. या आठवड्यात सलग सार्वजनिक सुट्ट्या आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून झालेल्या बदलाची नोंद नागरिकांनी घ्यावी असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते.












