न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२२) :- ‘ तू घटस्फोट दे ‘ अशी मागणी विवाहीतेकडे केली जात होती. त्याला नकार दिला असता पिडीतेचा शारीरिक व मानसीक छळ करण्यात आला. तसेच फिर्यादी यांनी कमावलेले तीन लाख रुपये व स्त्री धनाचे दिड लाखांचे दागिने पतीने स्वतः कडे घेतले. त्याची विचारणा केली असता नणंदेने फोनववरून शिवीगाळ केली.
दरम्यान आरोपी पतीने फिर्यादी या हयात असताना दुसरे लग्न करत त्यांची फसवणूक केली आहे. ही घटना लग्न झाल्यापासून २७ नोव्हेंबर २०१३ ते ८ ऑगस्ट २०२२ या दरम्यान विवाहितेचे सासर अहमदनगर येथे घडली.
पिडीतेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती दादासाहेब उर्फ सुरज नामदेव शिंदे (रा. शिरूर), सासरे नामदेव चांगदेव शिंदे, सासु दिर सागर नामदेव शिंदे व नणंद (सर्व राहणार अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.