न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवारी (दि. १४) रोजी शहरामध्ये पोलीस रॅली काढण्यात आली. यात पाचशे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला.
ही रॅली बिजलीनगर रेल्वे उड्डाणंपुलावरून पुणे-मुंबई महामार्गावरील खंडोबा माळ चौक येथे पोहोचल्यानंतर महामार्गवरून निगडीमधील भक्ती शक्ती चौक येथे पोहोचल्यानंतर रॅली निगडी येथील पोलीस मुख्यालयापाशी पोहोचली.
या कार्यक्रमात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त, सहसहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. चारचाकी पोलीस वाहने या रॅलीमध्ये सहभागी होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर रॅलीचा समारोप झाला.