न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२२) :- घरातील जुने सामान विकण्यासाठी फिर्यादीने ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. ते सामान खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादी यांना संपर्क केला. त्यांनतर फिर्यादी यांना सहा क्यूआर कोड पाठवून ते स्कॅन करायला लावले.
त्यांनतर त्याच्या बँक खात्यावर ५० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगून त्यांची एक लाख ४९ हजार ९९० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना ६ ऑगस्टला नवीन म्हाडा कॉलनी, मोरवाडी येथे घडली.
आशिष विजयप्रसाद वैष्णव (वय ३७, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












