न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२२) :- देशाच्या फाळणी स्मृतिदिनानिमित्त प्राधिकरण-चिंचवड स्टेशन मंडल येथे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे आणि माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी चौक परिसरात महिला व कार्यकर्त्यांनी मूक रॅली काढली. फाळणीच्या वेळी शहीद झालेल्या शहिदांना व कै. विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगणित, अनामिक, हुतात्मे आणि फाळणीच्या दुर्दैवी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप कुटुंबांना आदरांजली वाहण्यासाठी ही मुक रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी मंडल अध्यक्ष विजय शिनकर यांनी आपले विचार मांडले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, नगरसेविका शर्मिला बाबर, मंडल अध्यक्ष विजय शिनकर, शहर उपाध्यक्ष राजेंद्र बाबर, सलीम शिकलगार, समीर जावळकर, माजी महापौर आर एस कुमार, शहर चिटणीस माणिक फडतरे, सहकारी आघाडी अध्यक्ष प्रदीप बेंद्रे, मनोज देशमुख, अतुल इनामदार, मोहन बाबर, विनायक जगताप, रमेश बनसोडे, रवींद्र बोरलीकर, अजय कोल्हे, सुहास करडे, मुकेशभाई चुडासमा, प्रशांत साळवे, शलाका इनामदार, प्रमिला शिनकर, अंजली पाटील, सुनिता बाबर आदी उपस्थित होते.












