न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२२) :- भोसरीतील बैलगाडा शर्यत आखाडा येथे फिर्यादीचे वडील आणि आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना तुला संपवतो, असे म्हणत त्यांच्या छातीत चाकू खुपसला.
या हल्ल्यात फिर्यादीचे वडील गंभीर जखमी झाले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात गोविंद संभाजी तांबवडे हे जखमी झाले आहेत. हा प्रकार सोमवारी (दि. १५) दुपारी दोन वाजता भोसरी येथे घडला.
मोहन गोविंद तांबवडे (वय २४, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अक्षय विलास नागरे (वय १८), अभिषेक मारुती शिंदे (वय १८, दोघेही रा. मानगाव, मुळशी) यांना अटक केली आहे.












