न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२२) :- चिखली व तळवडे परिसरात साथीच्या रोगांचा शिरकाव होत आहे. वातावरणातील बदलामुळे थंडी, ताप, खोकला या सोबतच डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूची लक्षणे रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
परिसरातील खासगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागत आहेत. तर रक्त, लघवी तपासणीसाठी प्रयोगशाळांमध्ये गर्दी होत आहे. त्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून गल्लोगल्ली औषध फवारणीसोबतच नागरिकांची जनजागृती करून घाबरून न जाण्याचे अवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी घरामध्ये पाणीसाठा करू नये. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करावी. फ्रीज, कूलर, जुने टायरमधील पाणी वारंवार काढावे. थंडी, ताप, सर्दी खोकला अशी लक्षणे असतील तर, तात्काळ शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी.
तळवडे परिसरात थंडी तापाचे रुग्ण आढळत आहेत, काही वेगळी लक्षणे दिसली तर त्यांना यमुनानगर आरोग्य केंद्रात पाठवून तपासणी व उपचार केले जातात, अशी माहिती तळवडे विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका भोसले यांनी दिली.












