न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२२) :- जुन्या भांडणाच्या रागातून आरोपीने ‘संतोष, दहीहंडीच्या कार्यक्रमातून निघून का आलास. तुला दात आले का?’ असे म्हणत कटर काढून फिर्यादीच्या हाताच्या कोपराजवळ मारला. तेव्हा फिर्यादीने पळून जाण्यासाठी एकाला धक्का दिला. मात्र, दुसऱ्या आरोपीने फिर्यादीला घट्ट पकडून ठेवत ‘याला जिवंत सोडू नको, ठार मार’, असे म्हटल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादी हा दूध आणण्यासाठी दुकानात गेला होता. त्यावेळी आरोपी तेथे आले होते. हा प्रकार शुक्रवारी (दि. १९) चिखली येथे घडला. संतोष प्रभाकर काळबांडे (वय १९, चिखली) याने शनिवारी (दि. २०) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अशोक निर्मल, अजय संतोष भागवत (वय २१, दोघे रा. जाधववाडी, चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


















