न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२२) :- आईशी वाद घातल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादीच्या भावाच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, हातावर बेदम मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार चिखलीतील घरकुल येथे घडला.
अमोल बारीकराव शिनगारे (वय २५) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. समाधान बारीकराव शिनगारे (रा. सुखसागर हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार चिक्या ऊर्फ साहिल चंद्रकांत निसर्गन्ध (रा. कुलस्वामिनी हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली), माउली विष्णू उनवणे (रा. आनंदवन हौसिंग सोसायटी, घरकुल) व अल्पवयीन तीन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.















