- पिंपळे सौदागर आणि औंधमधील तीन आस्थापनांवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत आरोग्य व पर्यावरण विभागाचे नियम धुडकावल्याबद्दल तीन आस्थापनांना आर्थिक दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
सावर्जनिक ठिकाणी जैववैद्यकीय घनकचरा उघड्यावर टाकण्याऱ्या आस्थापानांवर पालिकेच्या ग्रीन मार्शल पथकाने प्रत्येकी ३५००० प्रमाणे कारवाई केली. पिंपळे सौदागर येथील धनश्री मेडिकल, हेल्थ एक्यूरेट लॅब, औंध येथील शाश्वत हॉस्पिटल यांच्याकडून दंडापोटी एक लाख पाच हजार रुपये वसूल करण्यात आले.
कारवाईत सहा आरोग्य अधिकारी महेश आढाव, आरोग्य निरीक्षक प्र.आ.नि उमेश जाधव, लिपिक आकाश मडके, मनपा कर्मचारी रवी हटकर, गणेश थरकुडे, MSF जवान दशरथ घुले, महेश कदम, वैशाली कदम व तृतीय पंथीय पथक यांचा समावेश होता.
















