- दिनेश यादव यांची पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२२) :- कुदळवाडीत महापालिकेची शाळा क्रमांक ८९ आहे. येथील प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या शाळेत १ ली ते ७ वी ची पटनोंदणी ३०० ने वाढली आहे.
आता शाळेची एकूण पटसंख्या ८३९ असुन, बालवाडीचीही पटसंख्या वाढत आहे. त्यामुळे नव्या इमारतीमुळे वर्ग वाढले आहेत. त्यामुळे बालवाडीसाठी अजुन दोन तुकड्यांना मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
















