न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२२) :- दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यात आले. बुधवारी मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी झाली.
दीड दिवस मनोभावे गणेशाची केल्यानंतर ” मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात गुरुवारी बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. घरगुती मूर्तीची पूजा-अर्चा करून शहरातील विसर्जन हौदात थाटामाटात विसर्जन करण्यात आले.
दोन ते अडीच वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच राज्य सरकारने सण – उत्सवांवरील निर्बंध उठवल्याने सर्वत्र उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.















