न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२२) :- एका फाऊंडेशनकडून पुणे शहरात १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान आयोजित कार्यशाळेत चक्क वैदिक सेक्स तंत्र शिकवण्यात येईल, अशी जाहिरात व्हॉट्सॲपद्वारे फिरत आहे.
याशिवाय डिव्हाईन फेमिनाईन, मस्क्युलाइन, एम्बॉडीमेंट, बायोएनर्जेटिक प्रॅक्टिसेस, चक्र ॲक्टिव्हेशन, ओशो मेटिडिटेशन शिकवण्यात येईल. कार्यशाळेसाठी पंधरा हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्कातच भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात ही जाहिरात फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने सायबर पोलिसांकडून या जाहिरातीची दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आल्याची माहिती सायबर पोलिसांकडून देण्यात आली. कार्यशाळेसाठी जाहिरातीवरील क्यूआर कोड, व्हॉट्सॲपद्वारे नोंदणी करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.