न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२२) :- लोणावळ्यात व्हॉटसप ग्रुपमध्ये घेतलं नाही म्हणून दहावीतील विद्यार्थ्यांनी फिल्मी स्टाईल हाणामारी केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर दोन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली, ते एकमेकांना ते शिवीगाळ करत होते.
तेवढ्यात दुसऱ्याने थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन्ही गटातील काही मुलं समोरासमोर आली आणि लाथा- बुक्क्यांनी फिल्मी स्टाईल हाणामारी करण्यास सुरूवात केली. दरम्यान तेथील नागरिकांनी पुढे येऊन मारहाण मिटवण्याचा प्रयत्न केला. मारहाण करणाऱ्या दोन्ही गटातील मुलांना शाळा परिसरातून हुसकावून लावण्यात आलं.
या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी विद्यार्थी आणि पालकांना बोलावून त्यांच्या समक्ष मुलांना समज दिली आहे. हाणामारी करणारे विद्यार्थी हे VSP शाळेतील असल्याचं लोणावळा पोलिसांनी सांगितलं आहे.










![[व्हीएसपी स्कूल] व्हॉटसप ग्रुपमध्ये घेतलं नाही म्हणून दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/images-7-2-90x60.jpg)
![[व्हीएसपी स्कूल] व्हॉटसप ग्रुपमध्ये घेतलं नाही म्हणून दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/2de8fa76-0685-4c66-914c-248a08b23f01-90x60.jpg)




