न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२२) :- पायी चालत जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला अडवून डोळ्यावर, पोटात बुक्क्या मारत मारहाण करण्यास सुरुवात केली.
तसेच जीवे मारण्याची धमकी देत गाडीवर जबरदस्ती बसवून घेऊन जात त्यांचा मोबाईल काढून घेतला व गुगल पे द्वारे जबरदस्ती पैसे काढून घेतले. ही घटना गुरुवारी (दि. १५) रात्री ११ ते १२ च्या सुमारास वल्लभनगर येथे घडली.
सुयश प्रमोद पाटील (वय २१ रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.