न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- महिनाभर सुट्टी घेऊन सीआरपीएफ जवाना आपल्या गावी गेला होता. परवा तो ड्युटीवर हजर झाला होता. सकाळी तो कामावर रुजू होण्यासाठी कार्यालयात आला. कर्मचाऱ्यांना तो टेरेसवरील शोरूममध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला.
पोलिसांना तळेगाव दाभाडे पोलिसांना कळवले. त्यामुळे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. जवानाला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. अमरीश कुमार गिरी (वय ३० वर्षे) असे गळफास घेतलेल्या जवानाचे नाव आहे.
तो मूळचा मिर्जापुर, उत्तर प्रदेश येथे राहणारा आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडला.